Press "Enter" to skip to content

सुनिल पाटील यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना ब्लँकेट व फळांचे वाटप करून साजरा

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सुनिल पाटील यांचा वाढदिवस पेणच्या अहिल्या महिला मंडळातील वृद्धाश्रमात असणा-या ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट व फळांचे वाटप करून साजरा केला.
मागच्या दोन वर्षांपासून आश्रमातील वयोवृध्दांना कुठेही बाहेर पडता आले नसल्याने त्यांना खुप खंत वाटत होती आपल्या कुटुंबात होणारे कार्यक्रम आपल्याला डोळेभरून पाहता येत नाही त्याचा आनंद या जेष्ठांना घेता येत नसल्याने साई सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांच्या माध्यमातून सुनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला.

पेण शहरातील अहिल्या महिला मंडळ संचलित वृद्धाश्रमातील अनेक जेष्ठ नागरिक सहवास करीत असून त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त मायेची उब देणारी ब्लॅंकेट आणि फळ वाटप केल्यामुळे माझ्या जिवनातील सोनं झालं आहे असे सुनिल पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक कल्पेश ठाकूर, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, सुविधा ठाकूर, सारिका पाटील, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील, विकी ठाकूर, मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी गाडगीळ, संचालिका वासंती देव, सुलभा सुर्यवंशी आदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.