Press "Enter" to skip to content

पेण येथील वैकुंठ निवास येथे भारतीय जनता पार्टीच्या जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज विभागाचे काम अधिक गतिमान करणार — पंचायत राज मंत्री कपिल पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी असणा-या ग्रामपंचायतीच्या विकासात्मक धोरणासाठी या खात्याची जबाबदारी माझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असल्याने यांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज विभागाचे काम अधिक गतिमान करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी भाजपच्या जन आर्शिवाद यात्रेच्या दरम्यान पेण येथील सभेत केले.

भारतीय जनता पार्टीच्या जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन पेण येथील वैकुंठ निवास येथे करण्यात आले होते यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, यात्रेचे संयोजक आमदार निरंजन डावखरे, पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रिकांत पाटील आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना कपिल पाटील म्हणाले की पंतप्रधानांनी सांगितले आपण पहिले घरी न जाता जनतेचे आर्शिवाद घेण्यासाठी जन यात्रेच्या माध्यमातून नागरीकांच्या समोर आर्शिवाद घ्या त्यामुळे महाराष्ट्रातील नागरीकांचा उत्साह पाहता विरोधकांची झोप उडाली आहे.त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीचा कारभारासह गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू न देता १४ आणि १५ वित्त आयोगासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला असल्ययान आता विकासात्मक कामे करणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानानी गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी यांच्याकडे निधी येत आहे.केंद्राच्या अनेक योजना असल्याने भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लाभार्थी शोधून लाभ मिळवून दिल्यास भाजपला कोणीही रोखू शकत नाही.

मागच्या ७५ वर्षोत काॅग्रेसला जमले नाही ते मोदीजींनी करून दाखविले त्यामुळे “मोदी है तो मुनकीन है” असे बोलून केंद्रात ओबीसी, एसी, एसटी अशा सर्व घटकांतील मंत्र्यांना संधी दिली असल्याने भाजप हाच आपला कुटुंब आहे पेणच्या विकासासाठी निधी करीता आपण संबंधित मंत्र्यांबरोबर बोलणार असल्याचे सांगितले. देशात लवकरच स्वामित्व योजनेद्वारे ग्रामिण भागातील नागरिकांना जागेकरीता प्रापर्टी कार्ड देण्यात येणार असल्याचे सांगून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजना राबविण्यात येणार आहेत. देशात सर्वक्षणानुसार तरूणांनी मोदीजींना पसंती दिली असून आता १७ नाही २७ पक्ष जरी एकत्र आले तरी २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार असल्याचे शेवटी सांगितले.तर यावेळी बोलतांना विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की केंद्रांने भरभरून दिल्यामुळे कपिल पाटील आणि नारायण राणे यांना कोकणाचा विकास करण्यासाठी पाठविले आहे.

शाहू फुले आंबेडकर यांचे नांव दरदिवसा घेणा-यांनी कधीच अशा लोकांना संधी दिली नाही. शिवसेनेने सुद्धा काय दिले कोकणच्या मतदारांनाही कौल दिल्याने आता शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाकरिता रस्ते विकास मंत्री गडकरी यांना विनंती केली त्यानुसार १०० कोटी रूपये रस्त्यासाठी दिली आहेत.त्यामुळे महाविकास आघाडी कोकणच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असून येणाऱ्या काळात भाजपचा कोकण हा बालेकिल्ला असणार आहे. तर देशात ९ वर्षोत कोणताच भ्रष्टाचार झाला नाही असे पंंतप्रधान देशाचे आहेत अनेक विकासकामे करीत असतांना पंतप्रधानानी जनतेची सेवा करण्याची प्रार्थना केेेेली आहे.विकास होतच राहणार असल्याने कपिल पाटील यांच्या सारखे मंत्री आपल्याला लाभले आहे त्यामुळे या पुढील ५ वर्षांत भरीव मदत कोकणास रायगड साठी होणार असल्याचे आमदार रविंद्र पाटील यांनी सांगितले.

यावेळी पेण तालुक्याच्या वतीने पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.तर तालुक्यातील सेझ प्रकल्प, गणपती कारखानदार, एमआयडीसी प्रकल्प, बाळगंगा धरण, गावातील विविध रस्ते,अंतोरे धरण रस्ता या सर्व समस्यांबाबत मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.तर एका ८० वर्षोच्या निराधार आजीबाईला तीन महिने शासनामार्फत येणारा निधी न मिळाल्याने तीने स्टेजवर जाऊन पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांना याबाबत निवेदन देऊन आपले ग-हाणे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.