सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने ऐनवेळी गणेश उत्सव साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेतला व उंचीवर ही मर्यादा घालण्यात आली होती.घरगुती गणेशमूर्ती दोन फूट उंच तर सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती ४ फूट उंच बनविण्याचा निर्णय देण्यात आला.यामुळे गणेशमूर्तीकारांना मोठा आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.यानंतर यावर्षीही कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु झाली.
कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याचे चित्र दिसत असले तरीही गणेश मूर्तिकार यांना शासनाने याविषयी या वर्षी नवीन निमावली जाहीर केली नव्हती.गणेश मूर्ती बनविण्याचे काम हे जवळ जवळ वर्षभर सुरु असते परंतु गणेश मूर्ती बनविण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर शासनाने जून महिन्यात पुन्हा एकदा घरगुती गणेश मूर्ती दोन फूट उंच व सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती चार फूट बनविण्याची नियमावली जाहीर केली व यामुळे यावर्षीही मूर्तिकार यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसणार आहे.
अगोदरच मुंबई-गोवा हायवे वरील चौपदरी करणात माझी जागा गेली असल्यामुळे जागा अपुरी पडत आहे. यात भरीत भर म्हणून गेल्या वर्षी ३जून रोजी निसर्ग चक्री वादळात पत्रे उडून गणेश मूर्तीनवर पडून गणेश मूर्तिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यामुळे मेहनत तर वाया गेलीच शिवाय इतर ठिकाणावरून मूर्ती आणाव्या लागल्या होत्या.तर या वर्षीही इतर ठिकाणावरून गणेश मूर्ती आणाव्या लागल्या असुन कलर्सच्या किंमतीही वाढल्या त्यातच उंचीच्या बंधनामुळे हा खर्च न भरून निघणारा असून गणेश उत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले असले तरी गणेशमुर्तीची ३५ ते ४० टक्के बुकिंग झाली असल्यामुळे आर्थिक नुकसान बसणार असल्याची माहिती कोलाड येथील गणेश मूर्तिकार प्रदीप एकबोटे यांनी दिली आहे.








Be First to Comment