Press "Enter" to skip to content

ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे ७५ वा स्वातंत्रदिन उत्सवाहात साजरा

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

भारतीय स्वातंत्रदिन १५ऑगस्ट रोजी रोहा तालुक्यातील मंजुळा वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे भारताचा ७५ वा स्वतंत्रदिन मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाला.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सक्लब ऑफ रोहाचे झोन चेअरपर्सन रवींद्र घरत यांच्या शुभहस्ते या शाळेचा ध्वजारोहण करण्यात आले .प्रसंगी यावेळी हभप नारायण महाराज लोखंडे सेवा निवृत्त शिक्षक गोविंद वाटवे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे,उपाध्यक्ष सुधीर लोखंडे,रायगड भूषण डॉ श्यामभाऊ लोखंडे,दिलीप मोहिते,रविंद्र मरवडे, संजय जाधव, अनिल महाडिक, जगन्नाथ भोईर, राहुल मोहिते,सुनील तुपकर,ऐनवहाल ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच सौ सुचिता गोळे,योगिता ठाकूर, आशा पवार,जागृती भोसले,स्वरा महाडिक,कृतिका धनावडे,दिव्या भोसले,शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे,शिक्षिका,सोनाली शिंदे,स्नेहा कडू,ऋतुजा पवार,शिक्षक विनायक माहिती व आदी विद्यार्थी वर्ग उवस्थित होते.

सदर यावेळी प्रशासकीय यंत्रणेच्या आदिपत्याखाली कोरोना संकटाचे पालन करत मोजकेच विद्यार्थी व पालक व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत या ठिकाणी स्वतंत्रदिन साजरा करण्यात आले यावेळी विदयार्थी वर्गाने स्वातंत्रदिनानिमित्त इंग्रजी, हिंदी, व मराठी भाषेतून ज्या शूर वीरांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले आशा थोर महापुरुषांना अभिवादन करत माहिती दिली तर उपस्थित रविंद्र मरवडे,संजय जाधव,अनिल महाडिक,सुधीर लोखंडे,डॉ श्याम लोखंडे,गोविंद वाटवे, रविंद्र लोखंडे,आदींनी स्वातंत्रेदिनाचे महत्व पटवून देत आपले मनोगत व्यक्त केले तर प्रमुख उवस्थित लाभलेले पाहुणे रविंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की कोरोना काळात शाळा बंद असतांना देखील येथील विद्यार्थ्यांनी अतिशय सूंदर मनोगत व्यक्त केले ऑनलाईन शिक्षण घेत असल्याचे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे बदल्यात काळात शिक्षणाला अधिक महत्व आहे खांब सारख्या ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची सुविधा येथील समाज घटकाला रविंद्र लोखंडे आणि सौ रिया लोखंडे या दाम्पत्याने उपलब्ध केल्याचा आनंद व्यक्त केला तर जीवनात इंग्रजी शिक्षणाला अधिक महत्व असल्याचे सांगत या शाळेच्या ध्वजावंदन करण्याचा बहुमान मला मिळाला आहे हे माझे भाग्य असल्याचे शेवटी सांगितले.

सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहा कडू यांनी केले प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सोनाली शिंदे यांनी केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.