Press "Enter" to skip to content

आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्यात फळे वाटप

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

पेण सुधागड रोहा मतदार संघांचे भाजपाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे येथील डॉ. कोकणे हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहा तालुका अध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, आमदार रविशेठ पाटील समर्थक सुभाषशेठ पाटील, तालुका सरचिटणीस आनंद लाड, संतोष लाड, विठोबा माळी, तिरतराव पोलसानी, तालुका शिक्षण सेल अध्यक्ष अशोक अहिरे, ज्ञानेश्वर शिर्के, प्रमोद गोळे, डॉ. जी. एस. कोकणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.