Press "Enter" to skip to content

नागोठणे लायन्स क्लबकडून प्रथमोपचार पेटीचे वाटप

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागोठणे येथील लायन्स क्लबच्या माध्यमातून परिसरातील विवीध ठिकाणी प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले. अनेेक ठिकाणी घडणाऱ्या लहान मोठ्या अपघातानंतर जखमींना बऱ्याच वेळा प्रथमोपचार करण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होत नाहीत. परीणामी त्यामुळे रक्तस्त्राव जास्त होतो. अपघात झाल्यास जखमींना प्रथमोपचार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जर लगेच मिळाल्या तर त्याला धीर मिळतो. याचबरोबर जखमींना रुग्णालयात नेण्यास अवधी मिळतो . या सर्व गोष्टींचे भान ठेवुन सेवा भावी संस्था असणाऱ्या नागोठणे येथील लायन्स क्लबच्या माध्यमातून हे फर्स्ट एड बॉक्स (प्रथमोपचार पेटी), बॅन्डेज, विवीध प्रकारच्या गोळ्या, ओआरएस एनर्जीची पावडर, हाडांसाठी स्प्रे, जखमेवरची पावडर – पट्ट्या, सॅवलॉन, सिप्ला डाईन अशा प्रकारच्या औषधांचा संंपूर्ण किट देेण्यात आले.

नागोठणे पोलीस ठाणे, नागोठणे एसटी स्थानक, नागोठणे ग्रामपंचायत कार्यालय, महामार्ग वाहतूक पोलीस चौकी वाकण,महामार्ग वाहतूक पोलीस चौकी ऐनघर या ठिकाणी हे किट लायन्स क्लबच्या माध्यमातून देण्यात आले .

या कार्यक्रमाचे वेळी नागोठणे लायन्सचे अध्यक्ष लायन सुजित महागावकर, उपाध्यक्ष लायन संतोष झोलगे , सेक्रेटरी लायन विवेक सुभेकर, खजिनदार लायन संतोष शहासने, ॲक्टीव्हीटी चेअरमन लायन यशवंत चित्रे , मेंबरशीप चेअरमन लायन विलास चौलकर , डायरेक्टर लायन संतोष मांडवकर आदी लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वरील सर्व ठिकाणी लायन्स क्लबच्या या महत्वाच्या ॲक्टीव्हीटीसाठी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व लायन्स सदस्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.