सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रोहा तालुका व नागोठणे विभाग भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महिलांसाठी मेहंदी व रांगोळी प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.
येथील शिव गणेश सभागृहात जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर तसेच तालुका सरचिटणीस आनंद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी व महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या प्रशिक्षण शिबीरात सहभागी झालेल्या महिलांना मेहंदी व रांगोली या संबंधीची शिकवणी देत योग्य ती माहिती दिली. याचबरोबर मेहंदी व रांगोळी यांचे प्रशिक्षण दिलेल्या या सहभागी झालेल्या महिलांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड,तिरथ पोलसानी, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी,महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा हेमा मानकर, नागोठणे शहर अध्यक्षा श्रेया कुंटे, माधुरी रावकर, निलिमा राजे-दफ्तरदार, शितल नांगरे,संज्योती लाड, स्वानंदी चितळकर,क्षितिजा कुंटे,प्रियंका पिंपळे,मुग्धा गडकरी,सोनी पांडे यांच्या सह नागोठणे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment