सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने रोहे तालुक्यातील मुठवली व मालसई येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
मुठवली व मलसई या दोन्ही गावातील १०वी, १२वी ,१५वी उत्तीर्ण झालेल्या विद्ार्थ्यांचे राज्यमंत्री व रायगड जिल्हा पालकमंत्री ना. अदिती तटकरे व तरुणाचे आदर्श , व सामाजिक बांधिलकी जपणारे युवा आ.अनिकेत भाई तटकरे,यांच्या मार्गदर्शनाखाली व येथील युवा कार्यकर्ते महेश तुपकर व मारुती तुपकर यांच्या संकलपणेतून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे उतिर्न्ह विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती सरपंच हेमंत मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे, सदस्य, कविता शेळके, अनिल अहिरे, मारुती तुपकर, तसेच सतिष ठाकूर, मंगेश तुपकर, सुनिल शेळके,धनराज शिंदे,सौरभ ठाकूर,किरण तुपकर,संजय मालुसरे, परेश मालुसरे,नरेश मालुसरे. आदी युवक व युवती उपस्थित होते.युवा कार्यकर्ते महेश तुपकर हे नेहमी सामाजिक बांधिलकी जपून गावासाठी व समाजासाठी मोलाचे योगदान देत असल्याचे मनोगत मारूती तुपकर यांनी व्यक्त केले.
तर सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान हा नक्कीच विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोलाचे ठरेल असे सांगून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे आभारही व्यक्त करण्यात आले.








Be First to Comment