Press "Enter" to skip to content

वडगाव जिल्हा परिषद विभागात गणेश घाटाचे उद्घाटन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वडगाव जिल्हा परिषद विभागातील इसांबे आणि तांबाटी येथे जिल्हा परिषद सदस्या पदमाताईं पाटील यांच्या जिल्हा परिषद सेस फंडातून प्रत्येकी सहा लाख रुपये निधीतून गणेशघाट बांधण्यात आले आहेत.या गणेघाटांचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या पदमाताईं पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

इसांबे आणि तांबाटी गावात गणेश विसर्जन करण्यासाठी घाट नसल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.हि समस्या परिसरातील नागरिकांनी माजी उपसरपंच सुरेश पाटील यांना सांगितली होती.यावर्षी गणपती विसर्जनासाठी गणेश घाट बनवून देण्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले होते.याकरिता जिल्हा परिषद सदस्या पदमाताईं पाटील यांच्याकडे मागणी करुन इसांबे आणि तांबाटी गावात गणेश घाट यावर्षी गणपती विसर्जनासाठी व्हावे यासाठी प्रयत्न केले.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने इसांबे आणि तांबाटी गावात गणेश घाट बांधून उदघाटन करण्यात आले.

यावेळी माजी उपसरपंच सुरेश पाटील आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या पदमाताईं पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याने नागरिकांनी दोघा उभयंतांचे कौतुक केले.

दरम्यान इसांबे गणेशघाट उद्घाटनप्रसंगी सरपंच पल्लवी विकास देवघरे,सरपंच संतोष ठोंबरे, उपसरपंच अनंता पाटील, उपसरपंच सारिका लाड,ग्रामसेवक प्रशांत कदम, ग्रामसेवक नलावडे,माजी उपसरपंच सुरेश पाटील, उद्योजक आत्माराम जांभुळकर, राष्ट्रवादी सरचिटणीस नरेश नामदेव पाटील,युवक अध्यक्ष तुषार मुंढे,हरेश पाटील, सदस्य मधुकर शितकणगे,माजी उपसरपंच विष्णू देवघरे, ग्रामपंचायत सदस्य संगिता मेगांळ, सदस्य जितेंद्र दळवी,भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर देवघरे,बबन गडगे, संदिप पाटील,शितळ पाटील, मेघा पाटील, स्नेहल गायकवाड, नितिन कदम, जगदिश आवस्कर, संभाजी चव्हाण, राकेश लाड,आशिष कोंडे, विश्वास पाटील,हरिश चव्हाण, राकेश गायकवाड, दिनेश पाटील,समीर देवघरे,दशरथ देवघरे, सोमनाथ देवघरे,सूरज देवघरे,भरत हिलम,शरद हिलम,अर्जुन देवघरे, नामदेव देवघरे, पांडुरंग देवघरे, दिनेश देवघरे,बंटी साळुंखे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.