Press "Enter" to skip to content

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनापासून द्रोणागिरी गडावर जाण्यास बंदी

द्रोणागिरी गडावर जाण्यास पर्यटकांना बंदी तर माती उखन्नास परवानगी का ?

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

उरण परिसरातील द्रोणागिरी गडावर पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ओएनजीसी कंपनीला धोका पोहचण्याची शक्यता लक्षात घेत सदर गडावर जाण्यास पर्यटकांना देशात 75 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना म्हणजे दिन 15 ऑगस्ट पासून बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचा नोटीस बोर्ड वन विभागातर्फे लावण्यात आला आहे. जर पर्यटकांमुळे ओएनजीसी कंपनीला धोका पोहचू शकतो तर दिवसा ढवळ्या डोंगर पोखरून उत्तखनन सुरू आहे. यामुळे धोका संभवत नाही का ? अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गडावर अनेक सामाजिक संघटना संवर्धन करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे दुर्लक्षित असलेला द्रोणागिरी गड नावारूपाला आला होता. या गडावरचा ट्रेक हा अवघ्या 2 ते 3 तासात पूर्ण होत असल्याने पर्यटकांचा दिवसेंदिवस ओढा वाढत चालला आहे.
ओएनजीसी उरण येथील द्रोणागिरी गडावर संवर्धन, ट्रेकिंग व पार्टी करण्यासाठी येत असतात. द्रोणागिरी गड शासनाने प्रतिषीद्ध क्षेत्र घोषित केले आहे.

सदर गडावर येणार्‍यांपासून ओएनजीसी कंपनीस धोका पोहचू शकतो. तसेच गडाचा वापर करून त्याचा उपयोग राष्ट्रहिताच्या विरोधात करू शकतात. तरी अशा घटकांना द्रोणागिरी गडावर प्रवेश मिळू नये याकरिता योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा निर्णय सुरक्षा शाखा नवी मुंबई, राज्य गुप्तवार्ता विभाग नवी मुंबई व इंटेलिजन्स ब्युरो नवी मुबंई विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकामार्फत घेण्यात आला आहे.

द्रोणागिरी गडावर जाणार्‍या जनतेला प्रतिबंध करण्यासाठी जाण्याच्या मार्गावर कुंपण घालून गेट लावावे. सदर गेटवर वन विभागाचा सुरक्षा रक्षक नेमून त्यांना प्रतिबंध करण्यात यावा. द्रोणागिरी गडाचा वापर करून काही अनुचित प्रकार घडल्यास वन विभागाला जबाबदार धरण्यात येईल असे पत्र नवी मुंबई विशेष शाखा पोलीस उप आयुक्त रुपाली अंबुरे यांनी वन विभागाला दिले आहे.

या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. जर पर्यटकांमुळे ओएनजीसी कंपनीला धोका पोहचण्याची शक्यता वाटते तर दिवसाढवळ्या सुप्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी डोंगराची करोडो रुपयांची माती नेली जात आहे. यामुळे ओएनजीसी कंपनीला धोका पोहचू शकत नाही का ? अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.

द्रोणागिरी गडावर संवर्धन करण्यासाठी काही सामाजिक संघटना नेहमीच पुढाकार घेत आहेत. तरी अशा संघटना व त्यांच्या सदस्यांना गडावर जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे समजते. वन विभागातर्फे सुरक्षेच्या कारणास्तव द्रोणागिरी गडावर जाण्यास प्रतिबंध असल्याचा नोटीस बोर्ड लावण्यात आला आहे. विना परवाना प्रवेश केल्यास भारतीय वन अधिनियम 1927 अनव्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा नोटीस बोर्ड गडाच्या मार्गस्थळावर काल लावला असून त्याची अंमलबजावणी देशाचा 75 वा स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट साजरा होत असतानाच करण्यात आली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.