सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी औद्योगिक क्षेत्रातील एचआयएल(हिल) इंडिया लिमिटेड कंपनीतील कास्टींग व तांब्याच्या धातूचे 63 एम एससाईंजचे 9 फायर हायड्रेन्ट व्हाॅल प्रत्येकी 1500 रुपये किंमतीचे जु.वा.कि.अ कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी शैलैंद्रकुमार राजाराम पांडे यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वता:च्या फायद्याकरिता चोरी करून पसार झाला आहे.
याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात 134/2021 दाखल करण्यात आला असून भादंवि संहिता कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे तपास करीत आहेत.







Be First to Comment