Press "Enter" to skip to content

शिवदेश संस्थेकडून चौकात गरीबांसाठी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवदेश स्वंस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गरीब ,गरजू लोकांसाठी कपडे व दैनंदीन वापराच्या वस्तू चौक येथील दत्त मंदिर समोरील स्टॉप जवळ कपाटा मध्ये ठेवण्यात आले आहेत . गरजू व्यक्तीने निस्कोचपणे घेवून जावे एक कर्तव्य म्हणून सदर उपक्रम संस्थेच्यावतीने राबविला जात आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक शिवाजी देशमुख उपस्थित होते तसेच सुधीर सोमोवंशी सचिव , डॉ शीतल सोमोवंशी व विजय ठोसर शिवदेश संस्था रायगड जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते .

भविष्यात ही असेच सहकार्य संस्थेला समाजातील दानशूर व्यक्तीनी व नागरिकांनी करावे . तसेच प्रत्येकाने एक कर्तव्य म्हणून आपल्या जवळील जे काही वस्तू अथवा साहित्य असेल ते गोरगरीब गरजुंना द्यावे असे आवाहन संस्थापक शिवाजी देशमुख यांनी केले आहे.सदर साहित्य किंवा , वस्तू , कपडे , भांडी जे जे असेल ते तुम्ही सदर ठिकाणी ठेवू शकता व त्या वस्तूची ज्या आपल्या गरजू बांधवांना आवश्यक असल्यास ते निस्कोच पणे घेवून जावू शकतात असे संस्थापकांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.