Press "Enter" to skip to content

ज्ञान कला क्रीडा संवर्धन संघटनेतर्फे महाड येथील छत्री निजामपूर गावातील पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

ज्ञान कला क्रीडा संवर्धन संघटना उरण विभाग (महाराष्ट्र )यांच्या वतीने महाड येथील छत्री निजामपूर या गावातील पूरग्रस्तांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकूर, उपाध्यक्ष विजय डोईफोडे, सेक्रेटरी श्रीमती मिताली कोळी, महिला अध्यक्ष प्रिया ठाकूर, खजिनदार मनीषा डोईफोडे, सल्लागार -सोनाली पाटील, सदस्य -नितीन कोळी, अमित रेड्डी, प्राची पानसरे, रामदास ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्तांना अन्नधान्य जिवनावश्यक साहित्याचे मदत करून ज्ञान कला क्रीडा संवर्धन संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेला मदत केलेल्या देणगीदारांचे यावेळी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.