सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
१५ ऑगस्ट भारताचा ७५ वा वर्धापन दिनानिमित्त घारापुरी बेटावर नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
घारापुरी बेटावर आम्हांला भारताचा तिरंगा झेंडा फडकावचा आहे.अशी विचारणा ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांच्याकडे नेव्हीचे अधिकारी वर्गांनी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीचे वतीने भारताचा ७५ वा वर्धापन दिन नेव्ही अधिकारी वर्गांचा सन्मान करीत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

नेव्ही,आर्मी,मिल्ट्री चे जवान अहोरात्र देशाची सेवा करीत असतात. त्यामुळे आपण सर्व सुरक्षित आहोत.त्यांच्या ह्या देशसेवेबद्दल जवानांचा सन्मान करता यावा म्हणून ग्रामपंचायत घारापुरी यांच्या वतीने कोस्ट गार्डचे व नेव्हीच्या अधिका-यांचे उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्यावेळी पदाधिकाऱ्यांकडून उपस्थितांना समुद्र सुरक्षा आणि १५ ऑगस्टचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी कोस्टगार्ड नवीमुंबई चे प्रमुख कमांडर श्री.अभिषेक गांगुली, नेव्ही चे कमांडर श्री.दिनेश जाधव तसेच त्यांचे सहकारी.. ग्रामपंचायतीचे सरपंच श्री बळीराम ठाकुर, उपसरपंच श्री.सचिन म्हात्रे, सदस्य श्री.भरत पाटील,श्री.मंगेश आवटे, सदस्या..सौ.मीना भोईर,सौ.सुभद्रा शेवेकर,सौ.शुभांगी मायने,राजिप मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. म्हात्रे सर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.सोमेश्वर भोईर गावातील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेटावर पहिल्यादांच नेव्ही अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाल्याने सर्व स्तरातुन या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.








Be First to Comment