Press "Enter" to skip to content

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा ३६ वा वर्धापन दिन साजरा

सिटी बेल | उरण | महेश गायकवाड |

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचा ३६ वा वर्धापन दिन अध्यक्ष घन:श्याम कडू यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष नवीन सोष्टे, साप्ताहिक उरण समाचारचे संपादक अतुल पाटील व इतर कोरोना काळात मयत झालेल्या पत्रकारांना, महापुरातील, महाडमध्ये दरड कोसळून मयत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ऑलॉपिंक स्पर्धेत पदक मिळवून देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

उरण तालुका मराठी पत्रकार संघ हा रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्न आहे. तरी जिल्हा पत्रकार संघांनी आम्हांला जिल्ह्यातील प्रकियेत सामावून घ्यावेत तसेच उरणमधील पत्रकारांना शासकीय सवलती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत मागणी माजी अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केली.
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय गोंधळी यांनी मार्गदर्शन करताना संघाच्या जडणघडण कशी झाली याची माहिती देऊन कोरोना काळातही आमच्या पत्रकार मित्रांनी जीवाची बाजी लावून वृत्तसंकलन केले होते असे सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष जे. एस. घरत, खजिनदार पालू भिंडे, सचिव रा. ऊ. म्हात्रे, सदस्य राजेंद्र नाईक, सुयश गायकवाड, महेश गायकवाड, वैशाली कडू आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.