Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक धनाजी बहिरु काळे यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात ऑगस्ट 2017

ते 2020 या काळावधीत सलग तीन वर्षांपेक्षा जास्त खडतर सेवा यशस्वीरीत्या पूर्ण केली.त्यांनी गडचिरोली टव्वे, जंगल परीसर,बोटझरी जंगल परिसरात प्रत्यक्ष नक्षलविरोधी चकमक अभियानात सहभाग घेऊन नक्षलवाद्यांचा डाव पाडून त्यांचा खात्मा करण्याची जिम्मेदारी पार पाडली.तसेच डिसेंबर 2019 मध्ये घडलेला जांभूळखेडा ब्लास्ट व एकूण 106 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी असलेला प्रमुख जहाल नक्षलवादी दिनकर उर्फ शिवराम बिकारु गोटा यास जेरबंद करण्याची महत्त्वाची कामगिरी धनाजी बहिरु काळे यांनी बजावली आहे.

या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.धनाजी काळे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल्याने त्यांचे पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे, रसायनी पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी यांनी धनाजी काळे यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.