Press "Enter" to skip to content

कोरोना संकटातही मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी कोरोना संकटाची भीती न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. मध्यरात्रीच्या धवजारोहणाचे हे सतरावे वर्ष आहे.

कर्जतच्या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चौकाच्या नामफलकाला नगरसेवक संकेत भासे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर इंडियन नेव्हीचे निवृत्त कमांडर बिपीन मिस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यांनतर बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी निवृत्त जवान दगडू धुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय मांडे, वैदेही पुरोहित आदी उपस्थित होते. यावेळी बिपीन मिस्त्री यांनी, ‘माझ्या 75 वर्षांच्या जीवनात मी पहिल्यांदाच मध्यरात्रीच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. कर्जतचे पत्रकार आणि कर्जतकर हा उपक्रम गेली सतरा वर्ष करीत आहेत. हे कौतुकास्पद आहे. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाडिले यांनी केले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, नगरसेविका मधुरा चंदन, हेमंत ठाणगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे, किसान मोर्चा कोंकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, राजाभाऊ कोठारी, जे. एम. मिर्झा, संदीप पाटील, राहुल तिटकारे, मुफद्दल डाभिया, विनायक उपाध्ये, कल्पेश शहा, पंकज पाटील, प्रभाकर गंगावणे, अरुण निघोजकर, मनोहर गोरेगावकर, वैशाली तिटकारे, अनिता गोरेगावकर, वसंत मोधळे, असीफ मिर्झा, रामदास गायकवाड, आत्माराम निघोजकर, मंदार दगडे, अभिजीत रेणोसे, ज्ञानेश्वर बागडे, मुस्तन कर्जतवाला, फातिमा कर्जतवाला, विनया उपाध्ये आदिंसह देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पोसरी मध्ये आमदार महेंद्र थोरवे, जनता विद्या मंदिर दहीवली व प्राथमिक शाळेत माजी आमदार सुरेश लाड, पंचायत समिती कार्यालयात सभापती सुषमा ठाकरे, नगरपरिषदे मध्ये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत दिवाणी न्यायालयात न्यायाधीश मुनोद तोकले, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत कार्यालयामध्ये उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, कोंकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य प्रा. चंद्रकांत गोंधळी, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये कार्याध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका शेतकरी खरेदी विक्री संघामध्ये माजी सरपंच परशुराम घारे, सहकारी भात गिरणीमध्ये अध्यक्ष जयवंत देशमुख, अभिनव ज्ञान मंदिर संस्थेमध्ये कार्यवाह जनार्दन मोघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माजी नगराध्यक्ष शरद लाड,राजेश लाड, रजनी गायकवाड, , संतोष पाटील, यमुताई विचारे, मोहन ठोसर, वसंत सुर्वे, विचारे आदींसह नगरसेवक, नगरसेविका, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.