सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
आऊल्स संस्थेतर्फे आयोजित सर्पमित्र संम्मेलन,२०१८ ला वनविभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या सर्पमित्र आचारसंहितेच्या अंमलबजावणीस नागपंचमी च्या शुभदिनी सुरुवात करण्यात आली.खालापूर तालुक्यातील दहाहून अधिक सर्पमित्रांनी परिक्षेत्र वनाधिकारी,खालापूर,रायगड येथे आपले प्रत्यक्ष फॉर्म जमा केले. यावेळी परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या वतीने ययाती साहेबांनी सर्व फॉर्म स्वीकारले.
खालापूर तालुक्यातील उर्वरित सर्पमित्र येत्या आठवड्यात नोंदणी पूर्ण करणार असून वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी उचलल्या सकारात्मक पाऊलाबद्दल सर्वस्तरावर कौतुक होत आहे.
सदर फॉर्म भरण्यासाठी खालापूर तालुक्यातील अभिजित घरत,नवीन मोरे,गुरुनाथ साठेलकर,अमोल ठकेकर,चेतन चौधरी, सुनील पुरी,सुशील गुप्ता,ऋषभ पोपळघट,अशोक मिस्त्री इत्यादी सर्पमित्र उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्रांनी आपल्या नजीकच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आऊल्सचे कुणाल साळुंखे यांच्याकडून करण्यात आले आहे.








Be First to Comment