Press "Enter" to skip to content

पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे उरणमध्ये आयोजन

आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी जीवन समर्पित– माजी आमदार मनोहरशेठ भोईर

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्था व लक्ष्मण नारायण भोईर शैक्षणिक संस्था, नवीन शेवा, उरण यांच्या वतीने कै गजानन भोईर यांच्या १७ व्या व कै सोनुबाई गजानन भोईर यांच्या ७ व्या पुण्यतीथी निमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम आज स्वा सावरकर माध्यमिक व ज्यू कॉलेज, नवीन शेवा येथे आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी समाजासाठी जीवन समर्पित केले आहे, समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी या माध्यमिक व ज्यू कॉलेजची निर्मिती केली असून, या शाळेतून शिकून हे विद्यार्थी बाहेर पडताना पाहिल्यावर खुप समाधान वाटतो.

यावेळी गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार, शिक्षकांचा सत्कार व मास्क व सेनेटराईज चे वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शिक्षक नेते नरेश मोकाशी, उरण समाजीक संस्थेचे दिनेश घरत, संतोष पवार यांनाही आपले मनोगत व्यक्त केले, तर संस्थेचे उपाध्यक्ष व शहर संपर्क प्रमुख श्री गणेश म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.

सदर कार्यक्रमास पनवेल तालुका प्रमुख रघुनाथशेठ पाटील, उरण नगरपालिकेचे शिवसेना गटनेते गणेश शिंदे, विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, नगरसेवक अतुल ठाकूर, उपतालुकाप्रमुख श्री कमलाकर पाटील, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुका संघटक के एम घरत, अमित भगत, सुधीर पाटील, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, मनोज पाटील, धनेश ठाकूर, धनाजी भोईर, पंढरीनाथ भोईर, वासुदेव घरत, मनोहर सुतार, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, महेश गावंड, प्रा राजेंद्र मढवी, भुपेंद्र पाटील, सुरेश पाटील, भालचंद्र भोईर, प्रभाकर भोईर, परशुराम भोईर, हेमंत गौरीकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयाळशेठ भोईर, उपाध्यक्ष श्री दिनेश घरत , सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे, खजिनदार श्री परशुराम ठाकूर, पंकज सुतार, शैलेश भोईर, उदय दरणे, मनोहर भोईर, मुख्याध्यापक संतोष म्हात्रे व शिक्षक वर्ग यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.