Press "Enter" to skip to content

पालदाड परिसरातील खड्डे बुझविल्याने प्रवासीवर्गाला मिळाला दिलासा

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

खांब-पालदाड-रोहे या मार्गावरील पालदाड नदी पुलाच्या रस्त्यावरील भागातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुझविल्याने प्रवासी वर्गाला तेवढाच दिलासा मिळाला आहे.

या भागातील रस्त्याची अवस्था पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दयनिय स्वरूपात झाली होती. परंतू संबंधितांनी याकडे लक्ष न दिल्याने सुरूवातीच्या पावसाळ्यात येथील रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडण्यास प्रारंभ झाला. मोठे पालदाड पूल ते उडदवणे गावापर्यंतचा रस्ता हा पुर्णपणे खड्डेमय झाल्याने येथून मार्गक्रमण करणे मोठे जिकरीचे होऊन बसले होते.तर पावसाचे पाणी खड्ड्यात तुंबल्याने व खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही बाईकस्वारांना अपघातालाही सामोरे जावे लागले आहे.

येथील रस्त्याची गंभीर समस्या लक्षात घेता येथील मालसई ग्रा.पंचायतीचे वतीने या भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुझविल्याने सद्य स्थितीत वाहनचालक व दैनंदिन प्रवासी वर्गाला सध्यातरी थोडाफार दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.तर मालसई ग्रा.पंचायतीने खड्डे बुझविण्याच्या कामी चांगले योगदान दिल्याने येथून प्रवास करणारे प्रवासी व वाहनचालक यांची सध्यातरी खड्डेमय रस्त्यातून मुक्तता झाली असून सर्वांना चांगला दिलासा मिळाला असल्याचे प्रवासीवर्गातून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.