सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील |
१८८४ मध्ये जासई विभागात माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जमीन बचाव आंदोलनामध्ये पागोटे गावातील हुतात्मा झालेले कमलाकर कृष्णा तांडेल यांची आई जनाबाई कृष्णा तांडेल (वय ९२) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.जनतेच्या हक्कासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर पुरूषाची आई जाण्याने पागोटे परिसरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे .
त्यांचा दहावा दिनांक २२ ऑगस्ट ला उरण येथील श्री क्षेत्र माणकेश्वर येथे होणार आहे तर बारावा २४ ऑगस्ट ला त्यांच्या राहात्या घरी पागोटे येथे होणार आहे.








Be First to Comment