Press "Enter" to skip to content

खालापूर तालुक्यातील सुसज्ज रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर

उपोषणानंतर न्याय न मिळाल्यास आत्मदहन – गोपीनाथ सोनावणे, संयोजक संघर्ष समिती

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

तालुक्यात सुसज्ज असे रुग्णालय होण्यात होत असलेला विलंब आणि सुभाष नगर येथे संरक्षक भिंतीचा प्रश्न या मुद्द्यावर
संघर्ष समिती रायगड जिल्हा व पोलीस मित्र संघटना यांचे वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शुक्रवारी करण्यात आले.

पोलीस मित्र संघटनेचे हनुमंत ओव्हाळ,संघर्ष समिती गोपीनाथ सोनावणे,आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान, सामाजिक कार्यकर्ते सतीश रावळ शुक्रवारी खालापूर तहसील आवारात उपोषणास बसले होते. तालुक्यात आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यातच औद्योगिक तालुका, मुंबई पुणे महामार्ग, द्रुतगती मार्ग ,राज्य मार्ग यांचे जाळे असल्याने अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी जखमींना उपचारासाठी पनवेल किंवा मुंबई गाठावी लागते. ही तडफड थांबावी यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव ओव्हाळ गेले अनेक वर्ष शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.

तालुक्यात पाली फाटा येथे रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्याप एकही विट रचली न गेल्याने रुग्णालय कागदावरच आहे. या विरोधात संताप व्यक्त करत उपोषण सुरू करण्यात आले आहे. याशिवाय खोपोली नगरपरिषद हद्दीतील सुभाष नगर येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात यावे या विषयासंदर्भात तसेच तात्काळ संबधित यंत्रणेने दखल घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे यानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन टोकाचे पाऊल उचलावे लागेल असे गोपीनाथ सोनवणे यांनी सांगितले.

उपोषणकर्त्यांची सोलापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट घेत पाठिंबा दर्शवला.
या करीता एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. हे उपोषणास बसले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.