सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिस विभागात विविध समाजोपयोगी विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून माजी सरपंच कृष्णा पारंगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
रिस विभागातील रिस व कांबे स्थानकावर नागरिकांना निवा-याची व्यवस्था नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.हि गैरसोय माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी लक्षात घेऊन रिस विभागातील कांबे आणि रिस या दोन थांब्यावर पंचायत समिती सेस फंडातून वाढदिवसादिनी दोन प्रवासी बसथांब्याचे उदघाटन करण्यात आले.तसेच कांचन पारंगे पंचायत समिती सेस फंडातून रिस येथे घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने रिस विभागासाठी 125 कचराकुंड्या पुरविण्यात आल्या.तसेच कांचन पारंगे यांच्या पंचायत समिती सेस फंडातून काळणाचीवाडी, नढाळ आदिवासीवाडी,वरोसे या ठिकाणी तरुणांना व्यायामासाठी साहित्य पुरविण्यात आले.रसायनी परिसरातील राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप,पाचशे आदीवासी कुटूंबांना साखर वाटप,सात आदीवासी वाड्यात नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ,राजिप शाळेला दोन फॅन आदी समाजोपयोगी उपक्रम माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले.

यावेळी काॅग्रेसचे इंटक सचिव तथा कामगार नेते महेंद्र घरत,पंचायत समिती सभापती वृशाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, सरपंच ताईं पवार, उपसरपंच राकेश खारकर, उपसरपंच प्रतिप पाटील,माजी सरपंच अशोक मुंढे, माजी सरपंच लक्ष्मण पारंगे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी,युवा काॅग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, निखिल डवले,माजी उपसभापती गजानन मांडे, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हस्कर, शेकापचे ज्येष्ठ नेते सुभाष आहिर,सागर सुखदरे, काॅग्रेस आयचे तालुकाप्रमुख नाना म्हात्रे,स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या माधुरी जांभळे, ऊर्मिला ढवळे, सदस्या धनश्री जांभळे, दिपाली म्हात्रे, देविदास म्हात्रे, अनिल पिंगळे,श्वेता कांबळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील,दिलीप पारंगे, नामदेव कोकंबे,प्रमोद राईंलकर,भालचंद्र राऊत,शंकर भोईर,सुप्रिया गायकर आदी उपस्थित होते.

माजी आमदार मनोहर भोईर जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उद्योगपती सुधीर ठोंबरे,हभप कांबेकर महाराज,हभप मांडे महाराज,पंचायत समिती अभियंता चव्हाण,माजी सरपंच जयदास पाटील,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडलेकर ,ग्रामसेवक कांबळे, माजी उपसभापती देविदास पाटील, प्रसिद्ध उद्योजक सचिन कोठारी,शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत,निलेश बाबरे, स्वप्निल राऊत,रिक्षा युनियन पदाधिकारी, ग्रामपंचायत व एमएसीबी कर्मचारी आदींनी उपस्थित राहून माजी सरपंच कृष्णा पारंगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.








Be First to Comment