Press "Enter" to skip to content

शेती बहरली ; पण … दाणेरहित, सौंदर्य सृष्टीची बळीराजास भुरळ

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

पावसाळा सुरू झाला की उजाड धरती जणू हिरवा शालू परिधान केल्याचा भास होत आहे.शेतामध्ये भात लागवड झाल्यामुळे जणू सर्वत्र ठिकाणी हिरवाई निर्माण झाली आहे.यामुळे गुरांच्या चा- यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.भात लागवड होवून एक महिना निघून गेला आहे.यामुळे शेती बहरली; पण दाणेरहित असेच दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

या वर्षी पाऊसाचे आगमन वेळेवर झाले.यामुळे भात लागवडीची कामे वेळेवर झाली मात्र पावसाने थैमान घातल्यामुळे तोंडाच्या घासावर अनेक शेतकरी वर्गांचे पाणी फिरले आहे.मात्र असे असले तरी सुद्धा काही शेतकरी वर्गांची शेती या पावसात टिकून राहिली.सध्या शेतातील भात लागवडमुळे सर्वत्र ठिकाणी हिरवळ निर्माण झाली.एके काळी अंगारा उधळणारी सृष्टी आज जणू सुवासिक पुलांच्या वासाने दरवळत आहे.असल्याचा भास निर्माण होत आहे.शेताच्या बांधावर, माळरानावर मोठ्या प्रमाणावर गवत रुजले आहे. त्यामुळे गुरांना खाद्य चांगल्या प्रमाणात मिळत आहे.

यामुळे पावसाच्या अगमनाने शेतजमिनी एकदम हिरव्यागार दिसू लागली आहे.शेती साधारण वर्गातील लोकांची असल्याने त्यांना सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात योजना मिळत नाहीत.त्यातच शेतीला कुंपणाच्या समस्येमुळे पाहिजे त्या प्रमाणात लागवडीखाली आणता येत नाहीत. पूर्वी सर्व शेती लागवडीखाली येत त्यामुळे कुंपणाची तरतूद शेतकर्‍यांकडून होत असे.मात्र आज मोकाट गुरांचे अतिक्रमण ,पावसाचे तांडव,भात पिकाला खोड किड्यांचा प्रादुर्भाव यामूळे आताच्या काळात बहुतेक शेतकरी भात शेती कडे पाठ फिरवत आहे. मात्र असे असले तरी सुद्धा ग्रामीण भागतील भात लागवड केलेली शेती हिरवीगार झाली असून दाणे विरहीत पाहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.