Press "Enter" to skip to content

पेहचान प्रोजेक्ट पाताळगंगा च्यावतीने महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील अतिरीक्त एमआयडीसी हद्दीच्या काही अंतरावर असलेल्या दुर्गंम भागातील महिलांना मोफत शिवणकामाचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी येरला प्रोजेक्ट अंतर्गत पेहचान प्रोजेक्ट पाताळगंगा आणि इंदेमित्सू ल्युब्रिंकांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जांभिवळी ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना तसेच सवणे भागातील महिलांना तीन महिन्यांचा मोफत शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

महिला सक्षमीकरण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून शिवणकामाच्या प्रशिक्षणातून महिला सक्षम व्हावी यासाठी जांभिवळी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी महिलावर्गाला तीन महिने शिवणकाम प्रशिक्षण जांभिवळी गावात तर सवणे भागातील महिलांना सवणे गावात देण्याचे सुरू करण्यात आले आहे.

यावेळी शिवणकाम प्रशिक्षण शिबिरात मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यानंतर मान्यवरांचे आभार मानून महिलांकरिता शिवणकाम प्रशिक्षणावर येरला प्रोजेक्ट सोसायटीचे प्रकल्पसंचालक श्रीपाल सप्तसागर ,इंदेमित्सू ल्युब्रिकांट कंपनीचे व्हाईंस प्रसिडेंट जितेंद्र नेगी, इंदेमित्सूच्या डेप्युटी मॅनेजर स्वप्निला आंबेकर, सिनिअर मॅनेजर भुषण दामले,सिएस आणि सिएस आर हेड आशिष रोहतागी यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर आपापले मत व्यक्त केले.

दरम्यान दुर्गम भागातील महिलांनी शिवणकाम प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरू करता यावा यासाठी पेहचान प्रोजेक्टकडून हा महिलांसाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.यावेली ४५ महिला उपस्थित होत्या.आपण शिवणकाम प्रशिक्षण घेऊन उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटूंबाला हातभार लागणार असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.

पेहचान प्रोजेक्ट रसायनी पाताळगंगा परिसरातील अनेक भागातील स्तनदा माता,गरोदर माता,लहान मुलांना सशक्त आहार आदी किटचे वाटप करत आहे.याप्रसंगी सरपंच रिया रविंद्र कोंडिळकर,सुपरवायझर ज्योत्स्ना देवमुख, शिवणकाम प्रशिक्षिका प्रार्थना देशमुख,येरला प्रोजेक्ट प्रकल्पसंचालक श्रीपाल सप्तसागर,इंदेमित्सू ल्युब्रिकांट कंपनीचे व्हाईंस प्रसिडेंट जितेंद्र नेगी, इंदेमित्सूच्या डेप्युटी मॅनेजर स्वप्निला आंबेकर,कंपनीचे सिएस आणि सिएसआर हेड आशिष रोहतागी, सिनिअर मॅनेजर भुषण दामले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन देवदास झेंडे यांनी पाहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.