सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण तालुक्यातील राजकीय जीवनामध्ये अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रतिनिधित्व करत असताना आपले राजकीय नेते महेश बालदी यांच्यासोबत शहानवाज मुकादम यांनी अनेक वर्ष राजकीय कार्य केले त्यांनी वीस टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण या तत्वाला महत्त्व दिले .भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा अल्पसंख्यांक समिती पदी त्यांनी कार्य केले.
रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांची कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी नेमून पक्षबांधणी केली व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा सर्व निवडणुकीत आपले महत्वाचे योगदान दिले. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी शहानवाज मुकादम यांना कोकण विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती देऊन एक मोठी प्रमुख जबाबदारी दिली.
यावेळी शहानवाज मुकादम यानी सांगितले की आपण कोकण विभागात अल्पसंख्यांक समाजातील अनेक गाव, वाडी, शहरे या ठिकाणी ते आपला राजकीय दौरा करून पक्षबांधणी साठी महत्त्वाचं कार्य करतील .








Be First to Comment