Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील संभे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम सोहळा आ.अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.

या कार्यक्रमातंर्गत कोलाड-रोहा मुख्य रस्ताचे संभे अप्रोज रस्ता डांबरीकरण करणे ह्या कामाचे भूमिपूजन व प्रा.शाळेसमोर संरक्षण भिंत बांधणे ह्या कामाचे उद्घाटन कार्यक्रम सोहळा माननीय आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आले.

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रितम पाटील,आंबेवाडी सरपंच जेष्ठ नेते सुरेश महाबळे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष जयवंत मुंढे,संभे माजी सरपंच राजेश सानप, गोवे ग्रा. पं.सरपंच महेंद्र पोटफोडे, खांबचे उपसरपंच मनोज शिर्के,युवा कार्यकर्ते राकेश शिंदे,संजय राजिवले, संजय मांडलुस्कर, नरेंद्र जाधव,येरळ ग्रा. पं.सदस्य दशरथ साळवी,गणेश वाचकवडे,संजय सानप, मंगेश सानप, ,देविदास सानप, मिलिंद पवार,रूपेश सानप, नाना सानप, संतोष सानप, नारायण कडव तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व संभे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने संभे गावासाठी दिलेल्या संभेगावाच्या नावाचे पाटीचेही अनावरण आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.