Press "Enter" to skip to content

विद्यालयास आँक्सिमिटर व थर्मामीटर तसेच शैक्षणिक साहित्याची भेट

सिटी बेल | खांब | नंदकुमार मरवडे |

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी या विद्यालयास
आँक्सिमिटर व थर्मामीटर तसेच शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते समीर मराठे,सुधीर मराठे,व रोशन बारस्कर यांच्याकडून सदरचे साहित्य विद्यालयास देण्यात आले असून यावेळी मुख्याध्यापक अनिल खांडेकर, सहा.शिक्षक गौतम जाधव,शिल्पा मरवडे, अर्चना मरवडे, सुप्रिया जाधव,ऋषीकेश महाडिक, सुजित लोखंडे, नितेश पोटफोडे आदी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते समिर मराठे,सुधिर मराठे-ठाणे व रोशन बारस्कर-राजखलाटी यांनी विद्यालयास केलेल्या या सहकार्याबद्दल संस्था व विद्यालयाचे वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.