Press "Enter" to skip to content

गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माई प्रकाश भोईर विराजमान 

सिटी बेल | कळंबोली | विकास पाटील |

पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश तेलंगे यांनी माई प्रकाश भोईर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या वाटचाळीला शुभेच्छा देण्यासाठी शेकापचे जेष्ठ नेते जे.एम म्हात्रे ( भाऊ )  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र घरत, रविशेठ पाटील,  राजेंद्र पाटील, भाजपचे अरुणशेठ भगत, सरपंच जितेंद्र म्हात्रे, पांडू मामा आदी मान्यवर उपस्थित होते. 


पनवेल तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या गव्हाण  ग्रामपंचायतीमध़्ये 17 सदस्य आहेत. त्यातील 4 सदस्य जातीच्या दाखला सादर करू न शकल्याने ते सध्या  कार्यरत नाहीत. सरपंच पदाची पहिली अडीच वर्षांची धुरा भाजपच्या हेमलता अजय भगत यांनी सांभाळली. त्यांचा कार्यकाल संपताच त्यांनी राजीनामा दिली.

त्यानंतर गव्हाण ग्रामपंचायतीची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी शेकापच्या माई प्रकाश भोईर यांची त्यांनी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी एकमताने निवड केली. सरपंत माई भोईर यांच्याकडून गव्हाण ग्रामस्थाच्या विकासा बाबात मोठ्या अपेक्षा आहेत  यावेळी ग्रामविकास अधिकारी- एम डी पाटील उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.