Press "Enter" to skip to content

कोलाड सपोनि सुभाष जाधव यांना आदिवासी मित्र पुरस्कार

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि सुभाष जाधव यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सोमवार दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना व एकलव्य आदिवासी संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने वनवासी कल्याण आश्रमशाळा उतेखोल येथे कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि सुभाष जाधव यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

कोलाड ठाण्याचे सपोनि सुभाष जाधव यांनी आदिवासी समाजाच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आदिवासी समाजाला योग्य त्या दिशा दाखविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच कोरोना काळात आदिवासी समजासाठी धान्य वाटप तसेच शिक्षण क्षेत्रात व व्यावसाय करण्यासाठी सुभाष जाधव यांनी आदिवासी समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन केले या साठी सुभाष जाधव यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.