Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजातर्फे जागतिक आदिवासी दिन उत्सहात साजरा

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजा तर्फे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साही वाटवरणात साजरा करण्यात आला. तर ठाकूर समाजा तर्फे रोहा तालुक्यात पहिल्यांदाज सकाळी११ ते ५.३० वाजेपर्यंत दिवसभर उन्हात फणसवाडी ठाकूरवाडी येथे साजरा करण्यात आला.या वेळी सर्व प्रथम रॅली काढण्यात आली. प्रतिमा पूजन झाल्या नंतर मान्यवरांचे भाषण, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, पारंपरिक पुरुष व महिलांचे नाच, व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी गोविंद रामा शिद अध्यक्ष रोहा तालुका ठाकूर समाज, उपाध्यक्ष जानू हंबीर,सचिव कमलाकर बांगारा, सहसचिव सखाराम ढुमणे,खजिनदार मचिंद्र लेंडी, महेंद्र हंबीर,सुतक, पदाजी निरगुडे, लिंबाजी पिंगळे , पिंगळे, किसन शिद,भास्कर लेंडी,बाबू शिद, यशवंत निरगुडा, भरत वारगुडे, होनाजी हंबीर, खेळू हंबीर, पांडुरंग शिद, गावित सर, संतोष पिंगळे, के के शिद, पांडुरंग हंबीर, जाणू हंबीर, रामा हंबीर यशवंत हंबीर,सुधागडचे केशव शिद, जानू शिद, सदानंद हंबीर, संदेश हंबीर, मनोज शिद, गोपाळ ढुमने,कु समीर ढुमने, लहू वाघमारे, मिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.सर्व कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.