सिटी बेल | कोलाड |
दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटना रायगड व रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून यावेळी गोवे कोलाड येथील पत्रकार विश्वास सकाराम निकम यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विश्वास निकम यांनी अनेक वेळा आदिवासी समाजाच्या जनहिताचे काम केले आहे. तर कोरोना काळात रायगड जिल्हा विविध संघटने मार्फत दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी सुमारे ४० ते ४५ डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष जाऊन काम केले आहे.यामुळे पत्रकार विश्वास निकम यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी गोरेगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले, कोलाड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, माणगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्वानाथ खेडेकर, अँड. योगेश तेंडुलकर, फादर रिची भाऊ,पत्रकार संतोष सुतार, महादेव जाधव, माजी कृषी अधिकारी काप, संजय घाग,यांचा ही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार,रजिप सदस्या वासंती वाघमारे, देऊ हिलम, बबन कोळी, संजय कोळी, सुदाम जाधव,नथुराम वाघमारे,नामदेव हिलम, दिनेश कातकरी, रायगड जिल्ह्यातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भिवा पवार व राजेंद्र पाटील यांनी केले.








Be First to Comment