Press "Enter" to skip to content

माहीती अधिकारी महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रघुनाथ कडू यांची निवड

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

रायगड जिल्हा माहिती अधिकार महासंघाची सभा ऑन लाईन पार पडली यावेळी  महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रोहा गोफण येथील सामजिक कार्यकर्ते रघुनाथ गणपत कडू यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.            

रोहा गोफण येथील रघुनाथ कडू हे अतिशय निर्मळ मनाचे स्वछ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व असून ते पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. ते स्वराज्य बहुउदेशीय संस्था संचालित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघात रोहा तालुका प्रचार प्रमुख पदांवर गेली दोन वर्षे कार्य करीत आहेत.

त्यांनी आपल्या पदाचा सदुपयोग करीत माहिती अधिकार अर्जा मार्फत विविध प्रकरणे निस्वार्थी पणाने उघड केली आहेत.हे कार्य करीत असताना त्यानी रोहा तालूका संघटना मजबूत केली आहे.ते सर्वाना सोबत घेऊन लोक हिताची कामे करीत असल्याने त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठांनी घेतली असून संस्थापक श्री बसवेकर व कोलते सर यांनी विचार विनिमय करून रोह्यातील रघुनाथ कडू यांची महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे.या निवडी नंतर त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.