Press "Enter" to skip to content

नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या ऑर्गनिझिंग सेक्रेटरीपदी महेंद्र माळी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या ऑर्गनिझिंग सेक्रेटरीपदी महेंद्र माळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

युनियनचा सच्चा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले महेंद्र माळी हे त्यांच्या मेहनतीने ब्रॅंचचा मॅनेजिंग कमिटी मेंबर, जॉईंट सेक्रेटरी, एनएडी मुबंई वर्कर्स कमिटी मेंबर, ब्रॅंचचा उपाध्यक्ष, ब्रँचचा कार्याध्यक्ष अशी एकामागून एक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच युनियनने त्यांच्यावर आणखीन जबाबदारी टाकत नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या ऑर्गनिझिंग सेक्रेटरीपदी त्यांची निवड केली आहे.

कॉ. सॅम्युअल ऑगस्टिन यांच्या आशीर्वादाने व कॉ. पानिग्रही, कॉ. आर. के. सिंग, कॉ. संतोष चव्हाण, कॉ. पी. एस. पवार व इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने माझ्यावर युनियनच्या ऑर्गनिझिंग सेक्रेटरी पदाची जबाबदारी टाकली आहे. त्या विश्वासाला तडा जावू न देता युनियनची ताकद कशी वाढेल व कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीन असा विश्वास नवनिर्वाचित नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या ऑर्गनिझिंग सेक्रेटरी महेंद्र माळी यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.