पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांची केली पाहणी ; पूजा चव्हाण हिच्या लग्नाचा खर्च दिपाली सय्यद करणार
सिटी बेल | पोलादपूर | घन:श्याम कडू |
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांना १० कोटींची मदत देऊनही स्वतः जातीने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांना जिवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला. यावेळी, त्यांनी पोलादपूर तालुकातील दुर्लक्षित असलेल्या धामणीवाडी आणि आंबेमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान दिपाली सय्यद यांनी शासनाने दुर्लक्षित गावांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा आणि दरडीचा फटका बसला आहे. यावेळी सढळ हस्ते मदत म्हणून १० कोटीं दिली. त्यानंतरही त्यांनी शांत न राहता मदतीचा हात म्हणून सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी स्वतः जातीने पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी, त्यांनी दुर्लक्षित दुर्लक्षित राहिलेल्या धामणीवाडी आणि अंबेमाची या गावांची देखील पाहणी केली.

या पाहणी दरम्यान दुर्गम भागात असलेल्या धामणीवाडी गावातील नऊ घरांना गेलेल्या घरांना आणि सुमारे ५0 ते ६0 एकर शेत जमिनीला गेलेल्या तड्यांची पाहणी केली. दरम्यान, गावातील घरांतील कुटुंबियांनी उपसरपंच यांच्या घरी तात्पुरते स्थळांतरीत करण्यात आले आहे. यावेळी, त्यांनी गावातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि शेगडीचे वाटप केले. तसेच उध्वस्त झालेल्या पूजा चव्हाण हिला मदतीचा हाभार देऊन तिच्या लग्नाचा सर्व खर्च करण्याची तयारी अभिनेत्री दीपाली सय्यद हिने दर्शविली आहे.

यावेळी, दिपाली सय्यद यांनी पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची गावानजीक रस्त्यावर कोसळलेल्या दरडीची पाहणी केली. २२ जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेमाची गावाकडे जाणाऱ्या डोंगरातील मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, गावाजवळच्या मार्गावर सुमारे ८० फूट उंचीवरून कोसळलेली दरड ही सुमारे ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळली आहे. यामुळे गावाकडे जाणाऱ्या २०० फूट रस्त्यावर दरडीचा ढिगारा कोसळल्याने रस्ता वाहून गेल्याने दरडीच्या मातीतून पायवाटेने मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान, आंबेमाची गावातील गावकऱ्यांना नाणेघोळ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान, दिपाली सय्यद यांनी सुमारे दोन किलोमीटर कोसळलेल्या या दरडीची पाहणी करण्यासाठी कच्च्या रस्त्यावरील दगडांतून चालत जाऊन पाहणी केली. त्यातकंग, गावाकडे जाणाऱ्या या मार्गावर दरड कोसळल्याने सुमारे १६ ते १७ दिवसांपासून ही दरड हटविण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून शासनाने तातडीने ही दरड हटविण्याची मागणी दिपाली सय्यद यांनी केली आहे.
यावेळी, दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , शरद पवार यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागाकडे लक्ष केंद्रित करून कोकणातील रहिवाशांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे सांगितले.











Be First to Comment