
पनवेल, दि.२८ (वार्ताहर) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण व दर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर, सामाजिक उपक्रमांवर तसेच नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या सकारात्मक बदलांवर भाष्य केले. उपस्थितांनी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकत त्यातील विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन समाजहिताच्या उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प व्यक्त केला. मन की बात’ या कार्यक्रमामुळे नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रभावी मंच उपलब्ध झाला असून, देशभरातील विविध प्रेरणादायी उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



Be First to Comment