उपोषणाचा दुसरा दिवस ; बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील केंद्र शासनाचा महत्वाचा प्रकल्प असलेल्या ONGC या कंपनीत स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत वेळोवेळी डावलले जात असल्याने नागाव- म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने सोमवार दिनांक 9/8/2021( ऑगस्ट क्रांती दिनी)पासून O.N.G.C उरण प्लांटच्या A.P.U. गेट समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे .आज दि 10 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
नागाव- म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरीत डावलून नागाव- म्हातवली हद्दीबाहेरील लोकांना नोकर्या देण्यात येतात.त्याचा निषेध करण्यासाठी व स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी सर्व बेरोजगार प्रकल्पग्रस्त एकवटले असून त्यांनी कायदेशीर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.
या बेमुदत उपोषणाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, उरण पंचायत समितीचे सभापती अँड. सागर कडू ,शेकाप उरण तालुका चिटणीस यशवंत ठाकूर, शेकाप जेष्ठ नेते काका पाटील, शेकाप जेष्ठ कार्यकर्ते अँड. प्रदीप पाटील,ज्येष्ठ पत्रकार प्रविण पुरो आदी मान्यवर उपस्थित होते.दिवसेंदिवस या उपोषणाला विविध राजकीय पक्ष व विविध सामाजिक संस्थाचा पाठिंबा वाढत आहे.
बेमुदत उपोषण करण्यासाठी नागाव- म्हातवली संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू, चिटणीस जितेंद्र ठाकूर, खजिनदार एस.के. पुरो,सदस्य घनश्याम ठाकूर, जनार्दन थळी, विलास पाटील, अलंकार घरत यांच्यासह 200 बेरोजगार युवक युवती उपोषण स्थळी हजर होते.









Be First to Comment