बंद दुचाकी वाहनांची केली मोफत दुरूस्ती
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
कोकणात झालेल्या अतिवृष्टीनंतर पुरग्रस्तांना सावरण्यासाठी अनेक ठिकाणाहून मदतीचे हात पुढे येऊन अनेकांनी आपापल्या परीने यथाशक्ती जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य केले. तर पुरग्रस्तांसाठी आपलेही काहीतरी योगदान असावे या उद्देशाने रोह्यातील रोठ खु.वाघेश्वर नगर येथील साई क्रुपा आँटो गँरेज भरत मालुसरे व जगदीश तुपकर यांच्या संकल्पनेतून महाड व चिपळूण येथील पुरग्रस्तांच्या शेकडो मोटर बाईकची मोफत दुरूस्ती करून एक आगळे वेगळे योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले आहेत.
साई कृपा गँरेजचे भरत मालसुरे,जगदीश तुपकर, ओमकार खंडागळे,अंटू शाव, अनिरुद्ध चौलकर, गौतम सावंत, लोचन तुपकर, मयुरेश तुपकर,समीर म्हस्के,ओंकार पिंपळे, राम सावंत, रघुवीर कडव, संदेश मादांडकर, संदेश तुपकर, सिद्धेश पवार,योगेश मोरे, दिनेश खंडागळे, प्रभाकर कडव आदी कुशल व अकुशल मोटर मेकँनिक टिमने महाड आणि चिपळूण येथील सुमारे शेकडो बंद पडलेल्या मोटर बाईक्सची मोफत दुरूस्ती करून अडचणीच्या काळात पुरग्रस्तांना मोठाच दिलासा मिळवून दिला आहे.या टिमने महाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ९६ बाईक्स व चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन,मार्कंडी येथे पुरग्रस्तांच्या १६८ मोटर बाईक्सची मोफत दुरूस्ती करून दिली. साई कृपा आँटो गँरेजच्या संपूर्ण टिमने एक दिवस महाड व एक दिवस चिपळूण येथे दोन दिवस आपला वेळ खर्च करून मोफत मोटर बाईक्सची दुरूस्ती करून दिली आहे.
दुरूस्ती केलेल्या मोटर बाइईक्स दुरूस्ती करण्यासाठी हजार रूपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित होता आणि नादुरूस्त मोटर बाईक्सची अवस्थाही अत्यंत वाईट स्थितीत झाल्याने सहसा कोणीही मेकँनिक या गाड्या दुरूस्ती करण्यासाठी पुढे आला नसता.परंतू साई कृपा आँटो गँरेजची सर्व टिम ही जणू आमच्यासाठी देवदूतासारखी धाऊन आली व त्यांनी फार मोठे पुण्याईचे काम केले असल्याची भावना वाहश चालकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.तर साई कृपा आँटो गँरेजच्या सर्व टिमचे समाजातील सर्वच स्तरातून कौतूक होताना दिसत आहे.








Be First to Comment