सिटी बेल | मुबंई |
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या सदस्यपदी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवघर येथील प्रा.एल.बी.पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली साडेबाराचा पलाट कवितेचे जनक आणि लेखक कोकण मराठी साहित्य परिषद चे ते कोकण अध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची मराठी भाषा विभागाची राज्य समितीची निवड बैठक होऊन अध्यक्ष यांच्या अनुमती ने प्रा. एल.बी.पाटील यांची निवड झाल्याचे पत्र मंडळ सचिव मीनाक्षी रा.पाटील यांनी दिले आहे. त्यांच्या निवडी मुळे साहित्यिकाकडून अभिनंदन होत आहे.








Be First to Comment