Press "Enter" to skip to content

माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनीत समाजोपयोगी उपक्रम

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा परिसरात राजकारणात व समाजकारणात सक्रीय असलेले नेतृत्व म्हणजे माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे.परिसरात विकासासाठी त्यांनी विविध विकासकामे राबवून परिसरात विकासकामांची गंगा आणली आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम हरिओम पार्कं जवळ वरद पतसंस्थेच्या आवारात पार पडला.यावेली अपंग व्यक्तींना जिवनावश्यक वस्तूंसह धान्यवाटप करण्यात आले.महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मिरची कांडप मशिन व पापड यंत्राचे वाटप करण्यात आले.

बौध्द समाज मंदिर व आदीवासी समाज मंदिरासाठी खुर्च्याचे वाटप करण्यात आले.कोरोना कालात गावोगावी फिरून सेवा देणाऱ्या आशासेविका,नर्सं , आरोग्य यंत्रणा यांचा सन्मान करुन आशासेविका,नर्स यांना साड्या वाटप, विविध सामाजिक संघटना, समाजसेवक आदींना कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.तसेच दांड रसायनी रस्त्यावरील गुरुद्वार रिस येथे सिसिटीव्ही कॅमेरा,पराडे काॅर्नंर येथे सिसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे उदघाटन करण्यात आले.

परिसरातील काही थांब्यावर नागरिकांसाठी बेंच बसविण्यात आले.आळी आंबिवली व शिवनगर नविन वसाहतीत हायमास्ट दिवे लावून उदघाटन करण्यात आले.मोहोपाडा मिनीडोअर थांब्याजवल जिमचे उदघाटन आदी कार्यक्रम पार पडले.

यावेळी राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती तथा विद्यमान सदस्या उमाताई मुंढे,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद रोकडे, ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडळेकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी, सरपंच ताई पवार, सरपंच अंकित साखरे, उपसरपंच राकेश खारकर,माजी उपसभापती गजानन मांडे,माजी सरपंच सचिन तांडेल, माजी सरपंच दिव्या जांभळे, माजी उपसरपंच सुरेश पाटील,माजी उपसरपंच दत्तात्रेय शिंदे,माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे, जेष्ठ नेते सुदाम मुंढे, तुळशीदास पाटील, कैलास म्हात्रे, डॉ किरण पवार, रोटरीचे अध्यक्ष गणेश काळे, जेष्ठ नेते सुभाष आहिर,वर्षां पाटील, अनिल पिंगळे,सुप्रिया गायकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.यानंतर शुभेच्छांचा कार्यक्रम होवून परिसरातील विकासकाम लोकार्पण सोहळा पार पडला.माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात गूरुवारी सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत विविध समाजोपयोगी कार्यक्रम होवून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची रेलचेल गणेशनगर येथील वरद टाॅवर येथे सुरू असल्याचे पहावयास मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.