सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन युवा टायगर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी पराग बालड यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे.रोखठोक, नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मनसे हा पक्ष असल्याने शिवाय राजसाहेबांचे विचार अंमलात आणण्यासाठी यूवा टायगर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षाने मनसेत आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.

मनसेत अनेक युवा तरुण प्रवेश करत असल्याने मनसेची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव ,रस्ते आस्थापनाचे कार्याध्यक्ष योगेश चिले ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण,पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, नवीन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालड ,कळंबोली शहराध्यक्ष अमोल बोचरे ,ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक संजय मुरकुटे, वाहतूक सेना पनवेल चिटणीस सुजित सोनवणे, पनवेल विद्यार्थी सेना शहर सचिव आकाश दलाल ,महाराष्ट्र सैनिक संचित मोरे,शिरीष सोनार,सुजल काशिद,निहार दिवकर आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment