Press "Enter" to skip to content

उरण ओएनजीसी प्रकल्पग्रस्त आंदोलनास माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा पाठिंबा

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण तालुक्यातील नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ओएनजीसी हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे.उरण नागाव ओएनजीसी प्रकल्पामध्ये गेले काही वर्ष सातत्याने विविध ठेकेदाराद्वारे नोकर भरती होत असताना नागाव म्हातवली येथील प्रकल्पग्रस्त, बेरोजगारांना जाणून बुजून डावलले जात आहे. बेरोजगारांच्या या महत्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेतर्फे आज सोमवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनी ओएनजीसी उरण प्लांटच्या एपीयू गेट समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे .

नागाव- म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरीत डावलून नागाव- म्हातवली हद्दीबाहेरील लोकांना नोकर्‍या देण्यात येतात,त्याचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या बेमुदत उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, या आंदोलनास शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच उरण पंचायत समितीचे सभापती अँड श्री सागर कडू, शेकाप उरण तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, शेकाप जेष्ठ नेते काका पाटील, शेकाप जेष्ठ कार्यकर्ते अँड. श्री प्रदीप पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रविण पुरो आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

बेमुदत उपोषण आंदोलनास नागाव- म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू, चिटणीस श्री जितेंद्र ठाकूर, खजिनदार श्री एस.के. पुरो, सदस्य श्री घनश्याम ठाकूर, श्री जनार्दन थळी,श्री विलास पाटील, श्री अलंकार घरत, व बेरोजगार युवक युवती उपोषण स्थळी हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.