विहूर चिकणी गावानजीक रस्ता खचला
सिटी बेल | अलीबाग | अमूलकुमार जैन |
11 जुलै रोजी मुरूड तालुक्यातील काशीद गावाजवळील पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 12 जुलै पासून मुरूड ते अलिबाग बंद पडला आहे.नव्याने उभारलेल्या या काशीद पुलाचे उदघाटन 2 ऑगस्ट 2021 रोजी अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, यांचे हस्ते करण्यात आले तरी या मार्गे अलिबाग ते मुरूड एस टी सेवा विहूर, चिकणी गावानजीक मोरी आणि रस्ता खचल्यानें अवजड वाहनांसाठी बंदच आहे अशी माहिती मुरूड बस आगार यांच्याकडून सांगण्यात आले आहे
या मार्गावर अतिवृष्टी मुळे चिकणी, विहूर गावानजीक मुख्य रस्ता खचल्यानें छोट्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे; मात्र धोका वाटत असल्याने एस टी बस सेवा सुरू करू नये असे पत्र तहसील प्रशासनाने बस आगराला दिले आहे.त्यामुळे मुरूड आगरातून भालगाव मार्गे रोहा मार्गे 50 किमी वळसा घेऊन अलिबाग येथें जावे लागत आहे. हा सर्व प्रकार म्हणजे एस टी आणि प्रवाशांसाठी नुकसान कारक आहे.असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष अमूलकुमार भलगट यांनी सांगितले.








Be First to Comment