Press "Enter" to skip to content

कै.ताराबाई विठ्ठल पाटील यांचे निधन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

जुनी पोसरी रसायनी येथील कै.ताराबाईं विठ्ठल पाटील यांचा वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या.त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच अंत्यसंस्कारासाठी सर्वपक्षीय मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कै.ताराबाईं विठ्ठल पाटील यांचा सरळ साधा मायाळू स्वभाव असल्याने त्या सर्वांना हव्याशा वाटायच्या. जूनी पोसरी गावात त्या सर्वांच्या आईं म्हणूनच परिचित होत्या.कै.ताराबाईं पाटील यांचे निधन झाल्याने रसायनी जूनी पोसरीसह आसपासच्या परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.13 आॅगस्ट रोजी श्री क्षेत्र गुळसूंदे येथे होणार असून उत्तरकार्य सोमवार 16 आॅगस्ट रोजी जूनी पोसरी रसायनी येथील राहत्या घरी होणार आहेत.यावेळी सकाळी 10 ते 11 वाजता हभप संदिप महाराज यादव यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.