सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
दांड रसायनी रस्त्यावरील रिस येथे भलेमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.वाहनचालक प्रवाशांची गैरसोय माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी लक्षात घेऊन स्वखर्चाने रिस रस्त्यावरील खड्यांची डागडुजी केली.
कंत्राटदाराने केलेलं निकृष्ठ दर्जाचे काम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामूळे अनेक खड्डे महत्त्वाच्या ठिकाणी पडले आहेत.खड्यांमुले या रस्त्यावर अपघातांना आमंत्रण मिळत होते.वाहन चालकांना वाहन चालविणे खुपच जिकीराचे होवून बसले आहे. ही समस्या विचारात घेऊन स्वखर्चाने रिस येथील रस्त्यावरील खड्ड्यांत डांबर मिक्स खडी टाकून जेसीबी व रोडरोलरने घट्ट दाब देऊन बुजविले आहेत.
पावसामुळे दांड रसायनी रस्त्यावर खड्डयात पाणी भरपूर प्रमाणात साचत असून या भल्यामोठ्या खड्याचा आंदाज वाहन चालकांना येत नसल्याने दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवताना खड्डे चुकविताना वाहनचालकांची तारांबळ उडत होती.यामुले खड्यांत वाहन आदळल्याने तसेच खड्यांतून मार्ग काढताना अनेकांच्या वाहनांना अपघात होऊन काहींना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास झाला आहे.दांड-रसायनी रस्त्यावरील रिस येथिल भलेमोठ्या व्यासाचा खड्डा पडल्याने गेल्या महिनाभरापासून अनेक वाहनचालकांना गंभीर दुखापतीना सामोरे जावे लागले आहे.
सदर समस्या अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडल्या परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष झाल्याने माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी स्वतः हून डांबर मिश्रण असलेला हायवा डंप्पर माल खड्यात टाकून जेसीबी व रोडरोलरने खट्ट दाब देऊन खड्डे बुजविल्याने माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या सामाजिक कामाचे वाहनचालक, प्रवाशांकडून कौतुक होत आहे.यावेळी श्याम म्हसकर ,संजय कांबळे,संतोष पारंगे,राजा कोकंबे,राम पारंगे,परेश मुंढे, श्रीहरी राठोड तसेच रसायनी पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस संदीप पाटील यांचे सहकार्याने वाहतुक व्यवस्था सूरलीत ठेवण्यास मदत झाली.कृष्णाशेठ पारंगे यांनी स्वःखर्चाने रिस येथिल रस्त्यावर पडलेला भलामोठा खड्डा भरल्याने वाहन चालकांना दिलासा मिळालेला आहे.








Be First to Comment