स्थानिक रोजगार करणा-या विक्रम चालकांच्या पाठीशी – आमदार महेंद्र दळवी
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने मुंबई गोवा महामार्गावरील कंपनीच्या गोवा गेट समोरील रस्त्यावर सुशोभीकरण सुरू केल्याने येथील रोजगार करणा-या स्थानिकांच्या वर गदा आल्याने या करीता आपण त्याच्या कायम पाठीशी उभे राहणार असल्याचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.
पेण तालुक्यातील वडखळ विभागाच्या विक्रम मिनिडोर व्यवसाय करणाऱ्या मालकां समोर नवीन संकट उभे राहिले असल्याने याकरिता जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी पुढाकार घेऊन स्थानिकांच्या व्यथा आमदार यांच्या कडे मांडल्या असता त्याची तात्काळ दखल घेऊन त्यांनी जेएसडब्ल्यू कंपनीच्या गेट जवळ येऊन त्यांची पाहणी केली कंपनीने सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबई गोवा महामार्गावरील कंपनीच्या गोवा गेट समोरील रस्त्यावर कंपनीतर्फे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 50 ते 60 फूट बांधकाम करून बगीचा तयार करण्याचे काम सुरू आहे.

यामुळे सदरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विक्रम मिनीडोअर व्यवसाय करीत असणा-या वाहनधारकांना सध्या आपली वाहने रस्त्यावर उभी करायला लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने सदरचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व शेकडो विक्रम चालकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे पाहून संजय जांभळे यांच्या पुढाकाराने येथील शेकडो विक्रम चालक मालकांनी आपल्या व्यथा मांडल्या. व कंपनी प्रशासनाकडून शासकीय भूखंड हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय जांभळे यांनी केला.
त्यामुळे या शेकडो विक्रम चालक मालकांना न्याय देण्याकरिता सोमवारी कंपनी प्रशासना बरोबर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून या यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे विचारणा केली जाईल व या
करीता आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकारांना यावेळी दिली.








Be First to Comment