Press "Enter" to skip to content

अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती रोहा येथे आढावा बैठक

महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती रोहा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ग्रामपंचायत हे ग्रामीण विकासाचे मुख्य ठिकाण आहे. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पशुवैद्यकिय अधिकारी, तसेच सर्व अधिकारी, सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंधरावा वित्त आयोग, घरकुल आवास योजना, पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर झालेली विकामकामे या अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

ग्रामसेवकांचा पारदर्शी कारभार, ग्रामस्थांना विविध विकासकामे व शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे बंधनकारक असताना ती माहिती योग्यरीत्या नागरिकांना दिली जात नाही यामुळे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहतात. ग्रामसेवकांच्या या संकुचित कामाच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली. यापुढे अशाप्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही या बाबतीत गटविकास अधिकारी यांना सुध्दा सूचना दिल्या. तसेच सरपंच व ग्रामसेवक व पंचायत समितीचे सर्व अधिकारी यांना समोरासमोर बैठकीचे आयोजन करुन नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.