सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे )गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनचे काम सन 2015 – 16 या आर्थिक वर्षात वर्षात मंजूर होऊनही अद्याप पर्यंत हे काम पूर्ण न झाल्याने या कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासकीय आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावे अन्यथा 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सात वाजता पंचायत समिती गेट समोर ग्रामस्थ आणि मनसेच्या माध्यमातून गेट बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे आक्रमक इशारा मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहाराद्वारे दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रामपंचायत खोपटे गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन 2015 – 16 या आर्थिक वर्षात नवीन पाईपलाईन मंजूर झाली होती पण संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी हे काम अपूर्णच ठेवले त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे सदर ठेकेदाराने अनेक वेळा काम वेळेत पूर्ण करण्यासाठी बॉण्ड पेपर दिले आहेत,गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे अनेकवेळा मीटिंग झाली.ग्रामपंचायतीला अनेक वेळा आश्वासने दिली तरी अजूनही हे काम अपूर्णच आहे.
त्यामुळे संबंधित शासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर शासकीय आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा खोपटे ग्रामस्थ आणि महाराष्ट्र निर्माण सेनाच्या माध्यमातून दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सात वाजता पंचायत समिती उरण येथे गेट समोरच गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी दिला आहे.








Be First to Comment