सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
आज वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व स्तरातून व माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत त्यात बांधपाडा खोपटे गावाच्या ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकून गावाच्या हितासाठी व सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण गावाचे लसीकरण करून कोरोना महामारीच्या या रोगाला हद्दपार पूर्ण गाव कोरोना मुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
सुराना हाॕस्पिटल चेंबूर मार्फत या लसीकरणाची सुरवात झाली ,या कार्यक्रमाचे उदघाटन बांधपाडा खोपटे सरपंच सौ.विशाखा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या अगोदरही बांधपाडा खोपटे ग्रामपंचायतीने या कोरोना काळात गाव व गावाच्या विकासासाठी व सुरक्षिततेसाठी अथक प्रयत्न व नियोजन केले आहे , सुरूवातीला कोरोना काळात गावातील प्रत्येक माणसाला मास्क सेनिटायझर वाटप केले तसेच संपूर्ण गावाचा चोख सुरक्षा बंदोबस्त करून संपूर्ण गाव फवारणी करून घेतले ,तसेच दुसऱ्या टप्प्यातही प्रत्येकी ४ मास्क व हन्डवाॕश वाटप केले तसेच या काळात कोरोना झालेल्या कुटुंबाला एका महिन्या चा संपुर्ण किराणा धान्य वाटप करण्यात आले.
बांधपाडा खोपटे गावच्या ग्रामपंचायतीचे असे उत्कृष्ट काम पाहता बाकी सर्व गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सगळी कडे बोलले जातेय.
या वेळी सरपंच.सौ.विशाखा प्रशांत ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे, मा सभापती राजेंद्र म्हात्रे देऊळ पाडा अध्यक्ष, संजय डाकी ग्रा.पं.सदस्य, देवानंद पाटील, संदेश म्हात्रे, रितेश ठाकूर, अच्यूत ठाकूर, सौ.मीनाक्षी म्हात्रे, सौ.जागृती घरत, सौ.शुभांगी घरत, सौ.भावना पाटील, सौ.राजश्री पाटील, सौ.करिष्मा म्हात्रे, प्रशांत ठाकूर ग्राम विकास अधिकारी, डी .एम .तुरे , कर्मचारी सह ग्रामस्थ उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी ग्रामपंचायत खोपटे तसेच ग्रामस्थ खोपटे यानी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment