सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला जाणारा रस्ता खचला त्यामुळे कोमनादेवी डोंगरात जाणारा मार्ग बंद होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु कोमना देवीचा हा रस्ता सारडे विकास मंचच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक साह्यातून दुरुस्त करण्यात आला आहे.

यासाठी मनसे उरण पूर्व विभागा कडून व गणेश नामदेव पाटील सारडे यांनी आपला मुलगा कु.देवर्ष याच्या वाढदिवसाच्या निमित्य सारडे विकास मंचला आर्थिक मदत केली होती. त्या मदतीच्या माध्यमातून रस्ता दुरुस्त करण्यात आला.
यासाठी महिला भगिनी सोबत विनायक म्हात्रे यांच्या सहकार्याने रस्ता दुरुस्तीचे काम करता आले. यामुळे माझं गाव स्वछ गाव, सुंदर गाव सारडे गाव अशी ओळख होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला.









Be First to Comment